Ved Puran
₹ 6300 +Shipping Free
Additional information
Weight 20.00 g
Dimensions 5.5 × 1 × 8.5 in
पर्याय १ – पूर्ण रक्कम भरून बुकिंग
पर्याय २ – ₹१,५०० Booking Amt + ₹४,८०० COD
₹ 1500 non refundable in case fail to pay 4800 at COD
भारतीय संस्कृतीचा मानदंड असणारा बहुमोल ठेवा म्हणजेच वेद, उपनिषदे आणि पुराणे होय. हे ग्रंथ संस्कृतमध्ये असल्याने सर्वसामान्यांना समजांवेत म्हणून आम्ही मराठीमध्ये घेऊन आलो आहोत “वेदपुराण”. नव्या पिढीला भारतीय संस्कृतीचे मर्म समजण्यासाठी हे ग्रंध त्यांच्या हाती देणे योग्यच होईल.
आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे एकूण ४० ग्रंथ वेदपुराण समाविष्ट ग्रंथ
१.ऋग्वेद, २.यजुर्वेद, ३.सामवेद, ४.अथर्ववेद, ५.पद्म पुराण – पूर्वार्ध, ६. पद्म पुराण – उत्तरार्ध, ७. अग्निपुरण, ८.मार्कंडेय पुराण, ९. नारद पुराण, १०.विष्णु पुराण ११. ब्रह्म पुराण,१२.समालोचन,१३. भागवत पुराण १४.भविष्य पुराण १५.ब्रह्मवैवर्तपुराण १६. लिंग पुराण १७. स्कंदपुराण पूर्वार्ध, १८. स्कंद पुराण उत्तरार्ध १९. वराह पुराण २०. वामन पुराण २१.कूर्मपुराण २२.मत्स्य पुराण २३. गरुड पुराण २४.ब्रह्मांड पुराण २५. शिव पुराण, २६. वायू पुराण २७. कल्किपुराण, सूर्यपुराण व नृसिंह पुराण २८. ऐतरेय,तैतरीय व प्रश्नोपनिषद् २९.मुद्गलपुराण ( उत्तरार्ध) नीलमत पुराण व दत्त पुराण, ३०. गणेश पुराण ३१. कालिका पुराण ३२. मुद्गलपुराण ( पूर्वार्ध) ३३. ईशावास्य, केन व कठोपनिषद् ३४.स्कंदपुराण (उर्वरित ) ३५. बृहदारण्यकोपनिषद् ३६.छांदोग्योपनिषद् ३७.मुण्डकोपनिषद् व माण्डुकोपनिषद् ३८. हरिवंशपुराण ३९. देवी भागवत ४०. आत्मपुराण
पर्याय १ – पूर्ण रक्कम भरून बुकिंग
पर्याय २ – ₹१,५०० Booking Amt+ ₹४,८०० COD
₹ 1500 non refundable in case fail to pay 4800 at COD
नमस्कार, सर्वप्रथम आपण सर्वांनी जो उदंड प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल आपणा सर्वांचे मन:पूर्वक आभारी आहोत. ‘प्रसाद प्रकाशन ही संस्था याच वर्षी ८० वर्षे पूर्ण करून ८१ व्या वर्षात पदार्पण करती झाली आहे. कै. य गो जोशी व गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांनी लावलेला हा प्रसादाचा वेलू आपण सर्वांच्या आशीर्वादाने उत्तुंग वाढला आहे.
आता या वेद पुराण व उपनिषद योजनेबद्दल थोडक्यात सांगते. माझे वडील कै. मनोहर य. तथा बापूसाहेब जोशी यांच्या कल्पनेतून ही योजना साकारली. कल्पना ही की वेद, उपनिषदे, पुराणे हे आपले स्त्रोतवाङमय म्हणायला हवे. संस्कृत भाषेच्या ज्ञानाअभावी यात काय असेल याची उत्सुकता तर असते परंतु ती शमण्याचे साधन उपलब्ध नाही. म्हणूनच साध्या सोप्या मराठी भाषेत, मूळ ग्रंथाचा आधार कोठेही न सोडता, आवश्यक तेथे संस्कृत देऊन मराठी भाषेत डॉ. प्र. न. जोशी व कै. स कृ देवधर यांनी हे ग्रंथ टप्प्याटप्प्याने लिहिले व आम्ही प्रकाशित केले. आता मूळ ग्रंथच श्लोक व अर्थ या पद्धतीने द्यायचे असे करायचे तर हा प्रकल्प कधीच संपला नसता. चार वेद, दहा उपनिषदे व तीस पुराणे यांची श्लोक व अर्थ अश्या पद्धतीने पृष्ठसंख्या लाखाच्या घरात आरामात पोचली असती. मग मूळ उद्देश जो हा की आधी मुळात आहे काय ते तरी समजून घ्यावे हाही सिद्धीस गेला नसता. त्यामुळे संक्षिप्त स्वरुपात एकेक पुस्तक अशी चाळीस पुस्तके यातून आकारास आली. यातील काही पुराणे व उपनिषदे मुळातच लहान असल्याने ती एकत्र करून एकूण चाळीस पुस्तके तयार झाली. त्यामुळे पुस्तकांची शीर्षकसंख्या जास्त व पुस्तकसंख्या चाळीस असे स्वरूप आहे. हा दीर्घकालीन प्रकल्प वाचकांना अतिशय पसंत पडला. व आजही तो वाचकप्रिय ठरला आहे.
आता या जाहिरातीबद्दल थोडे सांगते. आपणा सर्वांचे सहकार्य यात आम्हाला हवे आहे.
ही पुस्तके वेगवेगळ्या वेळी तयार होत गेल्याने व ग्रंथसंख्या चाळीस असल्याने त्याचा उपलब्ध साठाही कितीही प्रयत्न केला तरी सतत कमीजास्त होत असतो.
का बर? तर काही पुस्तके अनबाउंड स्वरुपात हाती असल्याने ती पटकन बाइंडिंग करून देता येतात. पण सर्वच पुस्तके तशी उपलब्ध नाहीत. किंवा होती परंतु भरगच्च प्रतिसाद मिळाल्याने संपत आली. मुळात नवे पुस्तक तयार करून हातात येणे ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. तिला कितीही प्रयत्न केला तरी काही एक ठराविक अवधी द्यावाच लागतो.
ज्यावेळी पुस्तके तयार झाली त्यावेळचे छपाई स्वरूप व आत्ताचे स्वरूप यात जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे बरीच पुस्तके अगदी डीटीपी करण्यापासून प्रक्रियेत घ्यावी लागली. या प्रक्रियेलाच वेळ लागतो. अन्यथा सदोष मुद्रणप्रत तयार होते. अगदी भर वेगाने हे काम चालू असले तरीही जोवर पक्की मुद्रणप्रत सर्वदोषरहीत होऊन हाती येत नाही तोवर निश्चित वेळ सांगणे हे अतिशय अवघड असते. त्यामुळे ती देता येत नाही.
सांगायला आनंद वाटतो की विजेच्या वेगाने जवळपास पस्तीस पुस्तकांचे काम आम्ही संपवले आहे. आणि उर्वरित पुस्तकांचे काम जोरात चालू आहे.
तसेच, ६,३०० रुपयांची ही किंमत ३५ पुस्तकांसाठी आहे, आगामी पुस्तकांसाठी नाही.
संचाचे वजन २० किलो आहे.
ग्रंथांची नावे आपणास कॉमेंट बॉक्समध्ये मिळतील. अडचण आल्यास आम्हाला ८४४६०३७८९० या फोन क्रमांकावर संपर्क साधावा. वेळ ११ ते ६, रविवार सुट्टी. धन्यवाद!
१) सूटी पुस्तकें उपलब्ध नाहीत. संपूर्ण संचच घ्यावा लागेल.
पेमेंटचे पर्याय
पर्याय १ – पूर्ण रक्कम भरून बुकिंग
₹६,३०० — ३५ पुस्तकांचा संच
सध्या उपलब्ध ३५ पुस्तकांसाठी एकूण रक्कम ₹६,३०० आहे.
Shipping FREE आहे.
आगामी पुस्तकांचा या ₹६,३०० मध्ये समावेश नाही.
पेमेंट Razorpay द्वारे सुरक्षितपणे करता येईल.
पर्याय २ – ₹१,५०० Booking + ₹४,८०० COD
आपण सुरुवातीला ₹१,५०० Booking Amount भरून संच बुक करू शकता.
उर्वरित ₹४,८०० रक्कम COD वेळी देता येईल.
महत्त्वाची सूचना: ₹१,५०० Booking Amount भरल्यानंतर आपण COD वेळी उर्वरित ₹४,८०० रक्कम देण्यास असमर्थ ठरलात किंवा ऑर्डर नाकारली, तर ₹१,५०० Booking Amount परत केली जाणार नाही.
टीप: ₹६,३०० ही रक्कम सध्या उपलब्ध ३५ पुस्तकांसाठी आहे आणि Shipping FREE आहे. आगामी पुस्तके उपलब्ध झाल्यानंतर त्यांची किंमत या रकमेत समाविष्ट नाही.
Vedas, Upanishads, and Puranas are precious treasures of Indian culture. Since these books are in Sanskrit, we have brought them into Marathi so that laymen can understand them as “Vedpuran”. It would be appropriate to hand this book to the new generation so that they can understand the essence of Indian culture.
Our Vedas, our Upanishads, and our Puranas total 40 texts
Vedpuran Set included
1. Rigveda, 2. Yajurveda, 3. Samaveda, 4. Atharvaveda, 5. Padma Purana – first half, 6. Padma Purana – Second half, 7. Agnipurana, 8. Markandeya Purana, 9. Narada Purana, 10. Vishnu Purana 11. Brahma Purana, 12. Commentary, 13. Bhagavata Purana 14. Bhavishya Purana 15. Brahmavaivarta Purana 16. Linga Purana 17. First half of Skandapurana, 18. Skanda Purana, Late 19. Varaha Purana 20. Vamana Purana 21. Kurma Purana 22. Matsya Purana 23. Garuda Purana 24. Brahmand Purana 25. Shiva Purana, 26. Vayu Purana 27. Kalkipurana, Suryapurana, and Narasimha Purana 28. Aitareya, Taitriya, and Praskatopanishad 29. Mudgalpurana (second half), Nilamat Purana, and Datta Purana, 30. Ganesha Purana 31. Kalika Purana 32. Mudgalpurana (first half) 33. Ishavasya, Ken, and Kathopanishad 34. Skandapurana (rest) 35. Brihadaranyakopanishad 36. Chandogyoupanishad 37. Mundkopanishad and Mandukopanishad 38. Harivamsa Purana 39. Devi Bhagwat 40. Atmapurana
Complete set weight is 20kg.
Payment Options
Option 1 – Full Payment
₹6,300 – 35 Books
The total amount for the currently available 35 books is ₹6,300.
Shipping is FREE.
Upcoming books are not included in the ₹6,300 amount.
You can make the payment securely through Razorpay.
Option 2 – ₹1,500 Booking + ₹4,800 COD
You can book the Vedpuran set by paying a ₹1,500 Booking Amount.
The remaining ₹4,800 can be paid by Cash on Delivery (COD) at the time of delivery.
Important: If you fail or refuse to pay the remaining ₹4,800 COD amount, or reject the order at the time of delivery, the ₹1,500 Booking Amount will be non-refundable.
Note: The ₹6,300 amount is for the currently available 35 books only, with FREE shipping. Upcoming books are not included in this amount.
Important Note: Individual or loose books are not available. The complete set must be purchased.

