Vedpuran
Original price was: ₹12,000.00.₹6,200.00Current price is: ₹6,200.00.
Description
भारतीय संस्कृतीचा मानदंड असणारा बहुमोल ठेवा म्हणजेच वेद, उपनिषदे आणि पुराणे होय. हे ग्रंथ संस्कृतमध्ये असल्याने सर्वसामान्यांना समजांवेत म्हणून आम्ही मराठीमध्ये घेऊन आलो आहोत “वेदपुराण”. नव्या पिढीला भारतीय संस्कृतीचे मर्म समजण्यासाठी हे ग्रंध त्यांच्या हाती देणे योग्यच होईल.
आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे एकूण ४० ग्रंथ वेदपुराण समाविष्ट ग्रंथ
१.ऋग्वेद, २.यजुर्वेद, ३.सामवेद, ४.अथर्ववेद, ५.पद्म पुराण – पूर्वार्ध, ६. पद्म पुराण – उत्तरार्ध, ७. अग्निपुरण, ८.मार्कंडेय पुराण, ९. नारद पुराण, १०.विष्णु पुराण ११. ब्रह्म पुराण,१२.समालोचन,१३. भागवत पुराण १४.भविष्य पुराण १५.ब्रह्मवैवर्तपुराण १६. लिंग पुराण १७. स्कंदपुराण पूर्वार्ध, १८. स्कंद पुराण उत्तरार्ध १९. वराह पुराण २०. वामन पुराण २१.कूर्मपुराण २२.मत्स्य पुराण २३. गरुड पुराण २४.ब्रह्मांड पुराण २५. शिव पुराण, २६. वायू पुराण २७. कल्किपुराण, सूर्यपुराण व नृसिंह पुराण
२८. ऐतरेय,तैतरीय व प्रश्नोपनिषद् २९.मुद्गलपुराण ( उत्तरार्ध) नीलमत पुराण व दत्त पुराण, ३०. गणेश पुराण ३१. कालिका पुराण ३२. मुद्गलपुराण ( पूर्वार्ध) ३३. ईशावास्य, केन व कठोपनिषद् ३४.स्कंदपुराण (उर्वरित ) ३५. बृहदारण्यकोपनिषद् ३६.छांदोग्योपनिषद् ३७.मुण्डकोपनिषद् व माण्डुकोपनिषद् ३८. हरिवंशपुराण ३९. देवी भागवत ४०. आत्मपुराण
नमस्कार, सर्वप्रथम आपण सर्वांनी जो उदंड प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल आपणा सर्वांचे मन:पूर्वक आभारी आहोत. ‘प्रसाद प्रकाशन ही संस्था याच वर्षी ७८ वर्षे पूर्ण करून ७९ व्या वर्षात पदार्पण करती झाली आहे. कै. य गो जोशी व गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांनी लावलेला हा प्रसादाचा वेलू आपण सर्वांच्या आशीर्वादाने उत्तुंग वाढला आहे.
आता या वेद पुराण व उपनिषद योजनेबद्दल थोडक्यात सांगते. माझे वडील कै. मनोहर य. तथा बापूसाहेब जोशी यांच्या कल्पनेतून ही योजना साकारली. कल्पना ही की वेद, उपनिषदे, पुराणे हे आपले स्त्रोतवाङमय म्हणायला हवे. संस्कृत भाषेच्या ज्ञानाअभावी यात काय असेल याची उत्सुकता तर असते परंतु ती शमण्याचे साधन उपलब्ध नाही. म्हणूनच साध्या सोप्या मराठी भाषेत, मूळ ग्रंथाचा आधार कोठेही न सोडता, आवश्यक तेथे संस्कृत देऊन मराठी भाषेत डॉ. प्र. न. जोशी व कै. स कृ देवधर यांनी हे ग्रंथ टप्प्याटप्प्याने लिहिले व आम्ही प्रकाशित केले. आता मूळ ग्रंथच श्लोक व अर्थ या पद्धतीने द्यायचे असे करायचे तर हा प्रकल्प कधीच संपला नसता. चार वेद, दहा उपनिषदे व तीस पुराणे यांची श्लोक व अर्थ अश्या पद्धतीने पृष्ठसंख्या लाखाच्या घरात आरामात पोचली असती. मग मूळ उद्देश जो हा की आधी मुळात आहे काय ते तरी समजून घ्यावे हाही सिद्धीस गेला नसता. त्यामुळे संक्षिप्त स्वरुपात एकेक पुस्तक अशी चाळीस पुस्तके यातून आकारास आली. यातील काही पुराणे व उपनिषदे मुळातच लहान असल्याने ती एकत्र करून एकूण चाळीस पुस्तके तयार झाली. त्यामुळे पुस्तकांची शीर्षकसंख्या जास्त व पुस्तकसंख्या चाळीस असे स्वरूप आहे. हा दीर्घकालीन प्रकल्प वाचकांना अतिशय पसंत पडला. व आजही तो वाचकप्रिय ठरला आहे.
आता या जाहिरातीबद्दल थोडे सांगते. आपणा सर्वांचे सहकार्य यात आम्हाला हवे आहे.
ही पुस्तके वेगवेगळ्या वेळी तयार होत गेल्याने व ग्रंथसंख्या चाळीस असल्याने त्याचा उपलब्ध साठाही कितीही प्रयत्न केला तरी सतत कमीजास्त होत असतो.
का बर? तर काही पुस्तके अनबाउंड स्वरुपात हाती असल्याने ती पटकन बाइंडिंग करून देता येतात. पण सर्वच पुस्तके तशी उपलब्ध नाहीत. किंवा होती परंतु भरगच्च प्रतिसाद मिळाल्याने संपत आली. मुळात नवे पुस्तक तयार करून हातात येणे ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. तिला कितीही प्रयत्न केला तरी काही एक ठराविक अवधी द्यावाच लागतो.
ज्यावेळी पुस्तके तयार झाली त्यावेळचे छपाई स्वरूप व आत्ताचे स्वरूप यात जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे बरीच पुस्तके अगदी डीटीपी करण्यापासून प्रक्रियेत घ्यावी लागली. या प्रक्रियेलाच वेळ लागतो. अन्यथा सदोष मुद्रणप्रत तयार होते. अगदी भर वेगाने हे काम चालू असले तरीही जोवर पक्की मुद्रणप्रत सर्वदोषरहीत होऊन हाती येत नाही तोवर निश्चित वेळ सांगणे हे अतिशय अवघड असते. त्यामुळे ती देता येत नाही.
सांगायला आनंद वाटतो की विजेच्या वेगाने जवळपास तीस पुस्तकांचे काम आम्ही संपवले आहे. आणि उर्वरित पुस्तकांचे काम जोरात चालू आहे.
ऑर्डर नोंदवली जाते तेव्हा वेबसाईटवर शिपिंग चार्जेस तुमच्या ऑर्डर पत्त्यावर अवलंबून असतात. संचाचे वजन २० किलो असल्याने त्यानुसार चार्जेस शिपिंग कंपनी परस्पर घेते. त्यात आमचा कोणताही सहभाग नसतो.
त्यामुळे आपला संच निश्चित करून ठेवावा व दोन ते तीन महीने शांतपणे वाट बघावी असे आमचे आवाहन आहे. काळजी करू नये. आम्ही आपली ऑर्डर पूर्ण करण्यातच व्यस्त आहोत.
ग्रंथांची नावे आपणास कॉमेंट बॉक्समध्ये मिळतील. अडचण आल्यास आम्हाला ८४४६०३७८९० या फोन क्रमांकावर संपर्क साधावा. वेळ ११ ते ६, रविवार सुट्टी. धन्यवाद!
१) सूटी पुस्तकें उपलब्ध नाहीत. संपूर्ण संचच घ्यावा लागेल.
२) पूर्वनोंदणी केल्यानंतर सुमारे २ ते ३ महिन्यांत पुस्तके उपलब्ध होतील.
Vedas, Upanishads, and Puranas are precious treasures of Indian culture. Since these books are in Sanskrit, we have brought them to Marathi so that laymen can understand them as “Vedpuran”. It would be appropriate to hand this book to the new generation so that they can understand the essence of Indian culture.
Our Vedas, our Upanishads, our Puranas total 40 texts
Vedpuran Set included
1. Rigveda, 2. Yajurveda, 3. Samaveda, 4. Atharvaveda, 5. Padma Purana – first half, 6. Padma Purana – Second half, 7. Agnipurana, 8. Markandeya Purana, 9. Narada Purana, 10. Vishnu Purana 11. Brahma Purana, 12. Commentary, 13. Bhagavata Purana 14. Bhavishya Purana 15. Brahmavaivarta Purana 16. Linga Purana 17. First half of Skandapurana, 18. Skanda Purana, Late 19 Varaha Purana 20. Vamana Purana 21. Kurma Purana 22. Matsya Purana 23. Garuda Purana 24. Brahmand Purana 25. Shiva Purana, 26. Vayu Purana 27. Kalkipurana, Suryapurana and Narasimha Purana
28. Aitareya, Taitriya, and Praskatopanishad 29. Mudgalpurana (second half), Nilamat Purana and Datta Purana, 30. Ganesha Purana 31. Kalika Purana 32. Mudgalpurana (first half) 33. Ishavasya, Ken, and Kathopanishad 34. Skandapurana (rest) 35. Brihadaranyakopanishad 36. Chandogyoupanishad 37. Mundkopanishad and Mandukopanishad 38. Harivamsa Purana 39. Devi Bhagwat 40. Atmapurana
Thank you very much for your prompt response and kind cooperation. Please help us with the following suggestions
1) Loose Books/Single Books are not available. The entire set must be purchased.
2) Books will be available in about 2 to 3 months after pre-registration.
Additional information
| Weight | 26.00 g |
|---|---|
| Dimensions | 5.5 × 1 × 8.5 in |





Leave a Reply