Register for Goshti Ghar Prakalp
‘प्रसाद प्रकाशन’च्या या अभिनव प्रकल्पात आजच सहभागी व्हा आणि दर महिन्याला एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या.
वर्षभराचे सभासदत्व घेऊन, दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी
संध्याकाळी, राखून ठेवा या एकमेवाद्वितीय रंजनासाठी.
सभासद शुल्क अवघे
रु. २५००/- प्रतिवर्ष यात समाविष्ट
विविध कार्यक्रम, कार्यशाळा
व वारसा सहल, छोटे कोर्सेस
आणि बरेच काही…
मर्यादित जागा … त्वरीत नोंदणी करावी
भारतीय संस्कृतीची नव्याने ओळख करून देणारे घर म्हणजे गोष्टीघर
भारतीय संस्कृतीच्या जिज्ञासूंनो, आपल्या या शोधप्रवासात, आमच्याकडे अस होतं, आमच्याकडे तस होतं अस वाटतं आणि आपण तस सांगतोही अशी मत मतांतरे कानावर येतातच. पण कोणी जर विचारलं तर नीट आपल्याला अधिकृत माहिती देता येतेच असे नाही. मग त्याला तुमची पुराणातील वानगी पुराणातच ठेवा असा रंग येतो. याला उत्तर एकच, नीट अधिकारी व्यक्तींकडून रंजक पद्धतीने माहीती मिळाली तर तो इतिहासाचा, तत्वज्ञानाचा तास राहत नाही, तर त्याला एका आनंदयात्रेचं रूप येतं. अश्या आगळ्या वेगळ्या आनंदयात्रेचे नाव म्हणजे गोष्ठीघर. गोष्ठीगृह म्हणजे संस्कृतमध्ये क्लबहाऊस, मंडळ. गोष्ठ की गोष्ट हा प्रश्न पडलाच असेल? तर गोष्ठ हाच खरा शब्द क्लब हाऊस साठी. गोष्ट म्हणजे स्टोरी राहते आपली पुस्तकात. आपण मात्र खरोखरचे छान सभागृहात भेटणार आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेणार. दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी संध्याकाळी असणार हा कार्यक्रम. प्रत्येक वेळी आगळा वेगळा, जगाच्या पाठीवर कुठे नाही गवसणार असा.
तर मंडळी, याचे
आजच सभासद व्हा व दर महिन्याला एक उत्कंठावर्धक अनुभव घेऊन पुढच्या वेळेसाठी आपल्या इष्ट मित्र परिवारासही सहभागी करून घ्या

