भारतीय कलेतील मिथक शिल्पे
₹140.00
🦁🦅 भारतीय कलेतील मिथक शिल्पे 🏛️
प्राचीन भारतीय कला ही केवळ शिल्पकला आणि चित्रकलेपुरती मर्यादित नसून ती कल्पनाशक्ती, संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरेचे अद्भुत दर्शन घडवते. विविध पशुपक्ष्यांचे एकत्रीकरण करून निर्माण झालेले काल्पनिक प्राणी, त्यांची शिल्परूपे आणि त्यामागील सांस्कृतिक अर्थ यांचा सखोल अभ्यास या ग्रंथात करण्यात आला आहे.
भारतीय मंदिरकला, पौराणिक प्राणी, व्याल, इहामृग आणि प्राचीन शिल्पपरंपरा यांचे आकर्षक दर्शन घडवणारा हा अभ्यासपूर्ण ग्रंथ कला, इतिहास आणि संस्कृतीप्रेमींसाठी एक अमूल्य ठेवा आहे.
भारतीय कलेतील मिथक शिल्पे, भारतीय कला, प्राचीन भारतीय शिल्पकला, मंदिर शिल्पकला, मिथक प्राणी, व्याल, इहामृग,
📚 आजच वाचा – भारतीय कलेतील मिथक शिल्पे
भारतीय कलेतील मिथक शिल्पे, भारतीय कला, प्राचीन भारतीय शिल्पकला, मंदिर शिल्पकला, मिथक प्राणी, व्याल, इहामृग, Indian Art, Mythical Animals, Temple Sculpture, Ancient Indian Culture, Indian Heritage
Description
प्राचीन भारतीय कलेचा अभ्यास करताना काही विलक्षण आणि चमत्कारिक गोष्टी नजरेस पडतात. भारतीय कला, मग ती शिल्पकला असो किंवा चित्रकला असो; विविध विषयांनी, देवदेवतांच्या कथांनी आणि त्यावर आधारित शिल्पांनी, पानाफुलांच्या सजावटींनी बहरलेली आहे. यामध्ये विविध पशुपक्षी यांचाही समावेश होतो. या पुस्तकाचा विषय हा पशुपक्ष्यांशीच निगडित आहे. जरी हा विषय भारतीय कलेत दिसणाऱ्या पशुपक्ष्यांसंबंधी असला, तरी या विषयाचा एक वेगळा आयाम दाखवण्याचा इथे प्रयत्न केला आहे. तो आयाम म्हणजे निव्वळ पशुपक्ष्यांचे वर्णन हा नसून, निरनिराळ्या पशुपक्ष्यांचे एकत्रीकरण करून तयार झालेले विलक्षण, मोहक असे काल्पनिक प्राणिविश्व आणि त्यांच्यामुळे बहरलेली भारतीय कला “भारतीय कलेतील मिथक शिल्पे” या पुस्तकातून आपल्यासमोर विविध उदाहरणांच्या रूपाने मांडली आहे.
Additional information
| Weight | 250 g |
|---|---|
| Dimensions | 5.43 × 0.20 × 8.27 in |





Leave a Reply